किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ .बाबासाहेब आंबेडकर बौद्ध बहुउद्देशीय सोसायटी कोदामेंढी तर्फे बसस्थानक चौकात उद्या मंगळवार (ता. 20 ऑक्टोबर)ला सायंकाळी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुउद्देशीय सोसायटीचे अध्यक्ष संदीप गजभिये ,उपाध्यक्ष संघपाल बोरकर ,सदस्यगण रोशन खोब्रागडे ,अनुप ठवरे ,प्रवीण साखरे, आशिष साखरे ,प्रफुल फुलझले ,प्रदीप बोरकर, नरेंद्र वाहने, जितेंद्र रंगारी ,अनिल खोब्रागडे ,तरुण गजभिये, मनोज खोब्रागडे, चरण खोब्रागडे, कांता रंगारी, शकुन तिरपुडे ,पंचफुला नंदेश्वर, लहाना ठवरे परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.








