किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव येथे सोमवार (ता. 19 ऑक्टोबर) ला नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी गरबा व दांडिया नृत्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या प्रांगणात रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थिनींनी ठेका धरला आणि संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्साही झाला.
गरबा-दांडियाचे सांस्कृतिक महत्त्व :
गरबा हा फक्त नृत्यप्रकार नसून तो शक्तीची उपासना आहे. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर हा लोकनृत्य प्रकार देवीच्या आराधनेचे प्रतीक मानला जातो.
1. एकता आणि समन्वय : गोलाकार फिरत केलेल्या गरब्यात सर्वजण एका तालात येतात, यातून एकतेची भावना वाढते.
2. शारीरिक व्यायाम : गरबा हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे शरीर सुदृढ राहते.
3. सांस्कृतिक जपणूक : आजच्या मोबाईल युगात लहान मुलांना आपली संस्कृती विसरू नये म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
शालेय परिसरात याचे महत्त्व :
शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर संस्कारांचे केंद्र आहे. अशा कार्यक्रमांमुळे :
विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर होतो :स्टेजवर नाचल्याने आत्मविश्वास वाढतो.
– मुलींचा सहभाग : मुलींना आपले कलागुण दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते. यामुळे शाळेतील मुलींच्या उपस्थितीत वाढ होते.
– आनंददायी शिक्षण : अभ्यासाच्या तणावातून मुक्त होऊन मुले शाळेकडे आकर्षित होतात. हीच खरी पीएम श्री शाळेची संकल्पना आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानला केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आंबीलकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले तर संचालन शिक्षिका प्रज्ञा रामटेके यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शा.व्य.स. अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद सुधीर कांबळे , सुधीर खंडाईत, राजेश रोहाड , उमेश उके, सुजाता बोदेले ,ज्योती आंबिलढुके , प्रज्ञा रामटेके ,संगीता आंबिलढुके , उमेश उके, पुष्पलता उके, रंजना उके यानी विशेष परिश्रम घेतले.








