spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाघाये महाविद्यालय लाखनी येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

हंसराज लाखनी भंडारा :- येथील स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. मनीषा सपाटे यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर सविस्तर प्रकाश टाकला. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की, “डॉ. कलाम यांना संपूर्ण जग ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखते. लहानपणी आकाशात उडणारे विमान पाहून त्यांनी मनात क्षेपणास्त्र क्षेत्रात कार्य करण्याचा ठाम निर्धार केला. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन करून त्यांनी देशाच्या संरक्षण व विज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले आणि पुढे देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला.” डॉ. कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र आजही प्रत्येक तरुणाला ध्येय गाठण्याची नवी ऊर्जा देते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) समन्वयक डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे यांनी केले. ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या आत्मचरित्राचे उत्स्फूर्तपणे सामूहिक व वैयक्तिक वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मुनेश्वर हलमारे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles