spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रावणवाडी जंगलात शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

भंडारा १३ : तालुक्यातील रावणवाडी जंगलात ४२ वर्षीय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृताचे नाव रमेश पंचबुद्धे (रा. खुर्शीपार, भंडारा) असे आहे.

सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता रमेश रावणवाडी-धारगाव परिसरात गेले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिकांना त्यांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने झाडाला लटकलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रमेश पंचबुद्धे हे मानेगाव बाजार येथील चैतन्य विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.

Popular Articles