spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धावत्या कारला अचानक आग; चालकाने उडी मारून बचावला जीव

 

नागपूर १३ : ओंकार नगर चौकात आज दुपारी धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून वेळेवर बाहेर पडून जीव वाचवला.

घटनेत फोर्ड फिगो कार चालवत असलेले शैलेश कावरे रस्त्यावरून जात असताना, गाडीमधून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच ज्वाळा पेटल्या. परिसरात घबराट पसरली. कावरे यांनी तत्काळ गाडी थांबवून बाहेर उडी मारली.

दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, गाडीचा बहुतांश भाग जळून खाक झाला.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Popular Articles