spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डोंगरगाव येथे भीषण अपघात: पादचाऱ्याचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू

 

नागपूर १३ : हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत व्यक्तीची ओळख भिष्म दिनुराम शाहू (वय ५०, रा. गोपालनगर, कळमना, नागपूर) अशी झाली आहे. शाहू हे त्यांच्या मुलीला आयटीआयची परीक्षा देण्यासाठी डोंगरगाव येथील मेघसाई खाजगी आयटीआयमध्ये घेऊन आले होते. परीक्षा केंद्रात सोडल्यानंतर ते रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या अशोक लेलँड कंटेनर (क्रमांक एमएच 40 सीएम 9800) ने त्यांना जोरदार धडक दिली.

धडकेनंतर कंटेनरच्या चाकाखाली शाहू चिरडले गेले आणि डोकं दुभाजकावर आपटल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा कंटेनर ‘भारती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपघात घडल्यानंतर काही वेळ या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर आणि चालकाला ताब्यात घेतले असून घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कंटेनर भरधाव वेगात असल्याचे स्पष्ट झाले असून, चालकाने वेळीच ब्रेक न लावल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles