नागपूर :- वीज वितरण व्यवस्थेचा कणा असलेल्या लाईनमन व तांत्रिक कामगारांच्या अतुलनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी तांत्रिक कामगार युनियनतर्फे ४ मार्च रोजी “लाईनमन दिन” सामाजिक बांधिलकीचा प्रकाशमय उत्सव म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तांत्रिक कामगार यूनियन चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
वादळ, पाऊस, पूर किंवा कोणतीही आपत्ती असो—स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवणारे लाईनमन हे समाजाचे खरे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करण्यासाठी यंदा “नवी दिशा – नवा विचार” या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
प्रमुख उपक्रम:रक्तदान शिबिर, विज सुरक्षा जनजागृती मोहिम (गांव / शाळा स्तरावर), वृक्षारोपण कार्यकम, संघटनेने प्रकाशित केलेली सुरक्षा पुस्तिका वाटप, सेप्टी टुल्स वाटप, स्वच्छता अभियान, अवयवदान संकल्प, संघटनेची त्रिसुत्री पत्र वाटप व प्रबोधन कार्यक्रम. या माध्यमातून केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता समाजाशी थेट नाळ जोडण्याचा आणि सामाजिक परिवर्तनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा युनियनचा संकल्प आहे. राज्यातील सर्व उपविभाग , विभाग, मंडळ, प्रादेशिक व केंद्रीय पदाधिकारी तसेच सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा दिवस यशस्वी करावा. “लाईनमन दिन” हा केवळ उत्सव नसून समाजासाठी समर्पण, सुरक्षितता आणि सेवा यांचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस ठरणार असून या कार्यक्रमांमध्ये सर्व सत्तरावरील पदाधिकारी व सभासदांनी सहभाग होण्याचे आवाहन तांत्रिक कामगार यूनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ सरचिटणीस प्रभाकर लहाने, आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे, राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले, बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम, नितीन चव्हाण, दत्तू भोईर, अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील यांनी केले आहे.




