spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तहसीलदार रमेश कोळपे यांची लोकसेवेतील निःस्वार्थ वृत्ती – समाजासाठी प्रेरणास्थान

 

“सरकारी खुर्चीत माणुसकी जपणारा अधिकारी म्हणजे रमेश कोळपे!”

रामटेक,  २  : रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांच्या कार्यपद्धतीबद्दल नागपूर व रामटेक येथील रहिवासी अश्विन ढोमणे यांनी लोकसेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करत प्रशंसा केली आहे. कोळपे यांनी दाखवलेली कार्यनिष्ठा, पारदर्शकता व माणुसकीची जाणीव ही प्रशासनासाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे.

कोळपे हे एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी असून त्यांची सेवा वेळेच्या चौकटीपुरती मर्यादित नाही. सकाळी ९ पासून रात्री १२ पर्यंत सातत्याने कार्यरत राहणे ही त्यांच्या सेवाभावाची जिवंत उदाहरणे आहेत. त्यांनी अनेक गरजू नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना वेळेत मदत पुरवून शासन यंत्रणेबाबतचा विश्वास दृढ केला.

ढोमणे यांनी आपल्या अनुभवातून सांगितले की, रामटेक तालुक्यातील त्यांच्या शेताच्या रस्त्यावर एका व्यक्तीने बेकायदेशीर अडथळा निर्माण केला होता. या समस्येसंदर्भात कोळपे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली असता, त्यांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने ऐकले आणि योग्य कायदेशीर सल्ला दिला — “सरकारी कायद्यांवर विश्वास ठेवा, सत्याचीच शेवटी विजय होतो.” या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून कायदेशीर प्रक्रियेने न्याय मिळवता आला व अडथळा दूर झाला.

फक्त प्रशासकीय जबाबदारी न निभावता, कोळपे यांनी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, निर्णयक्षमतेबरोबरच नम्रता आणि माणुसकी आहे. अश्विन ढोमणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या वतीने कोळपे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.