spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲनिमेटेड टीचर्स या संघटनेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

नागपूर :- असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲन्युएटेड टीचर्स या संघटनेची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा वानखेडे सेलिब्रेशन कळमना नागपूर या ठिकाणी संपन्न झाली. दीप प्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली. लोकांच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सभेचे उदघाटक डॉ. पंकज चांदे माजी कुलगुरू कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक हे होते. तर प्रमुख अतिथी हे प्राचार्य प्रभुजी देशपांडे, तसेच डॉ. अशोक जीवतोडे सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर हे होते. या सभेचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे यांनी केले. नागपूर विभागामध्ये ॲक्युसॅट ही संघटना पूर्वी देखील अस्तित्वात होती परंतु या संघटनेचे कार्य मात्र ठप्प झालेले होते घटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्यास प्रकृती अस्वास्थ्यामुळे असमर्थ असल्याचे कळवले होते. त्यामुळे नागपूर विभागांमध्ये या संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले. अल्पावधीतच या संघटनेमध्ये 152 सदस्यांची नोंदणी करण्यात आली. सदस्यांचा माझ्यावर असणारा विश्वास आणि माझ्यासोबत कार्य करणाऱ्या नागपूर विभागीय संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होऊ शकले. असे विचार डाॅ. शेंडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमांमध्ये एका स्मरणकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणीकेच्या मुख्य संपादिका डॉ. पुष्पा तायडे आहेत. तसेच प्रा.रामप्रकाश पंजाबी यांनी लिहिलेले ॲक्युसॅट संघटना हे पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन झाले असे घोषित करून आपल्या उदघाटकीय भाषणात डॉ. पंकज चांदे म्हणाले की या संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या तऱ्हेने सुरू आहे. या संस्थेने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरा पर्यंत विस्तार वाढवावा. निस्वार्थ वृत्तीने काम करणारे लोक कमी आहेत. सेवानिवृत्त प्राध्यापकाचे प्रश्न सोडवण्यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापकाची ही एकमेव संघटना आहे. संघटना जशी जशी मोठी होते तशी तशी ती अधिक बळकट होते. आतापर्यंत संघटनेने कायदेशीर मार्गाने लढा देऊन अनेकांना न्याय मिळवून दिला. ही चांगली बाब आहे. असे विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी प्राचार्य प्रभुजी देशपांडे आपल्या भाषणात म्हणाले संघटनेसाठी चार गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामध्ये संघटनेसाठी कार्यालय, कोष, कार्यकर्ते आणि काम. या संघटनेमध्ये केंद्रीय ठिकाणी कार्यालय सुद्धा उभारले गेले आहे.केंद्रीय कार्यकारीणीचे आर्थिक व्यवहार पारदर्शक आहे. संघटना दरवर्षी लाखो रुपयांचा इन्कम टॅक्स भरते. या संघटनेने सभासदांकडून कोर्टामध्ये केस दाखल करण्यासाठी जो खर्च येतो त्यापेक्षा अधिक निधी जमा झाला तेव्हा लोकांचे पैसे परत केले हे अभावानेच आढळते. दुसरे अतिथी डॉ. अशोक जीवतोडे सर म्हणाले कोणत्याही संघटनेमध्ये जेव्हा पदाची लालसा ठेवून लोक काम करतात तेव्हा हेवेदावे निर्माण होतात व त्याचा परिणाम संघटनेच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. परंतु जेव्हा लोक पदाचे लालसा न ठेवता सेवाभावी वृत्तीने काम करतात तेव्हा संघटनेचा विकास जलद गतीने होतो. संघटनेला सोळा वर्षे पूर्ण झाले त्या मानाने संघटनेची प्रगती वेगाने होत गेलेली दिसते. केंद्रीय कार्यकारिणीचे सचिव प्राचार्य डॉ. जे एम मंत्री सरांनी प्राध्यापकाच्या ग्रॅच्युईटीचा प्रश्न आणि कम्युटेशनचा प्रश्न या संदर्भामध्ये कोर्टामध्ये चालू असलेल्या केसेस किती बाबत उपस्थितांना अवगत केले अनेकदा कोर्टामार्फत मिळणारा न्याय विलंबाने मिळतो इथे आपल्याला अनेकदा व्यक्तिगत स्तरावर नुकसानही सहन करावे लागते संघटनेने आतापर्यंत ज्या ज्या कोर्ट केसेस लढल्या त्यापैकी 99% केसे निकाल हे संघटनेच्या बाजूनेच लागलेले आहेत. ही संघटनेसाठी जमेची बाजू आहे. या कार्यक्रमांमध्ये साहित्यातील व शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल नागपूर विभागाच्या सचिव डॉ.सौ. पुष्पा तायडे यांना शाल मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नागपूर विभागाच्या कार्यकारिणीचे सहसचिव डॉ.अशोक काळे यांना देखील त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवान्वित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.ए.बी.पाटील यांनी संघटना स्थापन करण्याचा उद्देश Not for me but for you असून तश्याच पध्दतीने संस्थेचे कार्य सुरू आहे. उदघाटनाच्या सत्राचे आभार प्रदर्शन नागपूर विभागाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेश इंगोले चंद्रपूर यांनी केले. द्वितीय सत्रामध्ये ॲक्युसॅटचे अंदाजपत्रक जमा खर्च प्रा.नाफडे कोषाध्यक्ष केंद्रीय कार्यकारीणी यांनी मांडले व त्याला सर्वांनी मंजूरी दिली. ऑडीट स्टेटमेंट ला मंजुरी वर्षभरात केलेल्या कामाचा कार्य वृत्तांत, व खुल्या चर्चासत्रामध्ये प्राध्यापकांचे, प्राचार्यांचे विविध प्रश्न तसेच काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. या सभेला महाराष्ट्रातील सर्व विभागातील जवळपास 200 सेवानिवृत्त प्राध्यापक प्राचार्य उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डाॅ.सौ. पुष्पा तायडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.अशोक काळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular Articles