spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

नागपूर :- भगवान बिरसा मुंडा आदिवासी महासंघा च्यावतीने धंतोली स्थित पत्रकार भवन च्या सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात किशोर सराटे माजी वैद्यकीय अधिकारी वेलतुर यांच्या अध्यक्षतेखाली भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अप्पर जिल्हाधिकारी सुधाकरराव कुळमेथे नागपूर यांनी बिरसामुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित केले. याप्रसंगी डॉ.दिलीप कुंभरे मुख्य वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर व डॉ. प्रेम मसराम, सत्कारमूर्ती भाऊराव इरपाते, डॉ.मधुकर कुंभरे, डॉ. गजाननराव धुर्वे, गिरीश कोवे, शाम सराटे, रमेश उईके (आदिवासी सेवक) संघटनेचे अध्यक्ष भाऊ खुरसंगे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे पुष्पहाराने स्वागत केल्यानंतर किशोर परतेकी, संदीप परतेकी यांनी बिरसामुंडा यांचे गोंडी भाषेत गीत गाऊन स्वागत केले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अप्पर जिल्हाधिकारी सुधाकरराव कुळमेथे यांनी बिरसा मुंडाचे जीवन चरित्र व त्यांनी आदिवासी समाजाला उद्देश दिल्या प्रमाणे समाजाने आचरण ठेवावे व जागृत व संघटित रहावे व अन्याया विरोधात बिरसा मुंडा प्रमाणे संघर्ष अर्थात उलगुलान करीत राहावे. असे उपस्थित आदिवासी जनतेस संबोधिले तसेच, गिरीश कोवे यांनी बिरसामुंडा यांच्यावर त्यांच्या जीवन कार्यावर कविता सादर केली. तसेच या कार्यक्रमात उदबोधन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश कावळे, मुकेश खुरसंगे संगीता मरकाम, चारुलता उईके, प्रभा खुरसंगे, मनोज उईके, प्रवीण मारकाम, मोतीराम सिरसाम, किशन खंडाते, टी.एम.सयाम, सार्थक सलामे, सुप्रिया सलामे, आस्था खुरसंगे, स्वरा खुरसंगे यांनी अथक परिश्रम घेतलेत. या कार्यक्रमात आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना विलास भोंगाडे यांनी केले तर आभार शाम सराटे यांनी मानले.

Popular Articles