spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वडगाव येथे महसुलच्या विशेष शिबिरात २९२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

– सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन

यवतमाळ :- सेवा संकल्प अभियानातंर्गत पुसद तालुक्यातील वडगाव येथे १६ ऑक्टोबर रोजी महसूल प्रशासनामार्फत विजाभज नागरिकांकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव येथे पार पडलेल्या या शिबिरात महसूल, आरोग्य, शिक्षण आणि पुरवठा विभागामार्फत ग्रामस्थांना विविध शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिराचे आयोजन व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांसह सर्व ग्रामस्थांसाठी करण्यात आले होते. शिबिरादरम्यान आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, सेतू सुविधा, पुरवठा विभागाच्या योजना, आरोग्य तपासणी आणि शिक्षण विभागाशी संबंधित विविध सेवा प्रत्यक्ष पुरवण्यात आल्या. या शिबिराचा सुमारे २९२ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.

हे शिबिर मंडळ अधिकारी एम.एस. शेळके आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही.एस. डोइफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

Popular Articles