spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर :- प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि डॉ.आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष विलास गजघाटे, समितीचे सदस्य एन.आर.सुटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.मेहेरे उपस्थित होते. मान्यवरांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष विलास गजघाटे यांनी आपल्या भाषणातून दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “एका महान पर्वाला, एका क्रांतिसूर्याला अभिवादन करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. दलित, शोषित आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महानायक, लोकनेते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी तसेच भूमिहीनांचे कैवारी म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती.” ते पुढे म्हणाले की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे केवळ एक नाव नसून तो एक जिवंत इतिहास आहे. नाशिकचा ऐतिहासिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह असो किंवा भूमिहीनांचा सत्याग्रह, प्रत्येक लढ्यात त्यांनी सत्याची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची ढाल बनून पुढाकार घेतला. “जमीन कसणाऱ्याची, जमीन राबणाऱ्याची”हा नारा देत त्यांनी महाराष्ट्रातील भूमिहीनांच्या जीवनाला नवी दिशा दिली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles