spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नितीन नागदेवते यांना विजयी करण्याचे आवाहन

– बी.कॉम.शिक्षित नितीन नागदेवते यांच्या नावासमोर ‘१’ क्रमांक नोंदविण्याचे पदवीधर मतदारांना आवाहन

नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ च्या निवडणुकीत नितीनजी महेश नागदेवते हे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले असून, त्यांच्या नावासमोर पसंतीचा अनुक्रमांक ‘ 1’ नोंदवून त्यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे विदर्भ पूर्व अध्यक्ष नितिन नागदेवते यांनी सर्व पदवीधर मतदारांना आवाहन केले आहे. पत्रपरिषदेमध्ये मंचावरील अहमद कादर यांनी त्यांच्या संघटने तर्फे समर्थन जाहीर केले असून या सोबतच विदर्भ आंदोलन समिती व मुस्लिम पिस फोरम यांच्या तर्फे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार नितीन महेश नागदेवते यांना समर्थन जाहिर केले आहे. पदवीधर तसेच बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पदवीधर नोकरदारांचे प्रश्न विधान परिषदेत ताकतीने मांडण्यासाठी आजाद समाज पार्टीचे विदर्भ पूर्व अध्यक्ष नितीन महेश नागदेवते या पदवीधर संघात निवडणूक लढत आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर अशा सहा जिल्ह्यात पक्षाचे मजबूत संघटन तयार करून कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. या मतदार संघात 2,55,603 मतदार असून या सर्वांना व्हाट्सअप मेसेज, टेक्स्ट मेसेज, व्हाईस कॉल च्यावतीने मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले आहे. याशिवाय काही मतदारांचे वैयक्तिक ग्रुप द्वारे, विवीध पदवीधरांच्या तसेच सामाजिक संघटनांशी संपर्क करून प्रचाराला सुरुवात झाली आहे. आणि मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. माझ्या नावा समोर पसंती क्रमांक 1 लिहून विजयी करावे. अशी मागणी नागदेवते यांनी पत्रपरिषदेत केली आहे. पत्रपरिषदेत उपस्थित मंचावरील अहमद कादर, महाराष्ट्राचे महासचिव डॉ.जे.बी रामटेके, पूर्व विदर्भ मीडिया प्रमुख सुशिलकुमार ढोलेकर, प्रवक्ता सलमान पठाण, आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Popular Articles