spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पांढरकवडाचा राजा नेताजी गणेशाचे भक्तिमय वातावरणात आगमन

– पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत

पांढरकवडा :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी गणेशाचे मंगळवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक सजावटीच्या वातावरणात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. विविध ठिकाणी भाविकांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेत स्वागत केले. गणरायाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले असून, गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पांढरकवडा पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख चौकांसह मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या.

गणरायाच्या आगमनावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या आगमनामुळे आगामी गणेशोत्सवासाठी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.