किशोर साहू: मौदा, ता.१२ : तीन दिवसाच्या संततधार पावसामुळे नागपूरला आवागमन करण्यासाठी शॉर्टकट रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या अरोली – नागपूर मार्गावरील किरणापुर – दुधाळा रस्तादरम्यान असणारा भंडारा कालव्याच्या पूल क्षतीग्रस्त झाल्याने अरोली पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मार्ग बंद केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने अरोली, कोदामेंढी, चोखाळा ,किरणापुर व परिसरातील वाहनधारकांना दुप्पट फेरा मारून नागपूरला जावे लागत आहे त्यामुळे ते कमालीचे त्रस्त आहेत. या क्षतिग्रस्त पुलियाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी दुधाळा येथील सरपंच उमेश झलके ,सामाजिक कार्यकर्ते पंढरी कडू यांच्यासह परिसरातील त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.
Latest News
Related Posts
अरोली – नागपूर मार्गावरील किरणापुर – दुधाळा रस्त्यादरम्यान असणारा भंडारा कालव्याच्या पूल क्षतीग्रस्त






