कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी पुलीया जवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत संशयास्पद स्थितीत आढळल्याची घटना आज दुपारी 12 वाजता निदर्शनास आली असून सदर मृतदेह मागील पाच दिवसापूर्वीचा असून या मृतदेहाचे कुत्र्याने लचके तोडल्याचे निदर्शनास आले असून या मृतदेहाबाबतीत विविध चर्चाना पेव फुटले असून कदाचित खून झाला असावा असा अंदाज व्यक्त करन्यात येत आहे मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातुन मृतदेहाचे स्पष्ट होईल तेव्हा सदर मृतदेहासंदर्भात ओळख पटल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करणयात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी सह नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,एपीआय सचिन यादव आदींनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासनीसाठी मृतदेह शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास घटनेची नोंद केली असून शवविच्छेदन अहवालातुन मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.



