कामठी :– ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त कामठी येथील बाल उद्यान, नागसेन नगर मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला नप नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते श्रद्धापूर्वक माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांनी समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून महिला आणि वंचित घटकांना पुढे जाण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या संघर्ष आणि कार्याचे स्मरण सदैव केले जाईल. असे मनोगत नप. नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेविका प्रतिभा रघुवीर मेश्राम, आकाश मेश्राम, सिद्धार्थ गौस्वामी, महेश सोमकुवर, धीरज कडबे, राजू बोरकर, राजू मेश्राम, प्रकाश लाईनपांडे, अनिरुद्ध गजभिये, नितीन खोब्रागडे, महेंद्र खोब्रागडे, सोपान खोब्रागडे, मुकेश चवरे, अक्षय गजभिये, निलेश खोब्रागडे, सतीश उर्फ गोलू खोब्रागडे, विशाल पाटील, शुभम पाटील, सोनू मेश्राम, मोनू मेश्राम, अजय देशभ्रतार, परेश क्रुशूगेवार, सुरेश सूर्यवंशी, सोहम काटोले, तक्षक कडबे, शिल कडबे, वंश पौनिकर, अनमोल मेश्राम, राजू गवरे, बंटी देशभ्रतार इत्यादी सह असंख्य सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




