spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘गण गण गणात बोते’ मंत्राने दुमदुमणार शितलवाडी नगरी

-‘श्री’ चा प्रकट दिन सोहळा ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान महासोहळ्याचे आयोजन

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- ‘श्री’ चा प्रगट दिनात्सवानिमित्त ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान महासोहळ्याचे आयोजन शितलवाडी येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान येथे सुरुवात होत आहे. ‘ गण गण गणात बोते ‘ मंत्राने शितलवाडी नगरी दुमदुमणार आहे. ‘श्री’ चा दर्शनासाठी भक्तांची ८ फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळ्यात मांदियाळी राहणार आहे. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी राहाणार असुन या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आलेले आहे. दरम्यान दिनांक ८ फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता श्रीं चा अभिषेक होईल. रविवारी सकाळी ८.३० वाजता श्रींच्या पादुकांची पालखी काढण्यात येईल. टाळ-मृदंगाचा गजर, फुलांनी सजलेली पालखी आणि वारकऱ्यांचे शिस्तीत नगरभ्रमणामुळे अवघी नगरी चैतन्यमयी होणार आहे. दुपारी १२ वाजता ह. भ. प. दिगांबर बुवा नाईक यांचे गोपाल काल्याचे किर्तन होईल. दुपारी ३ वाजता गोपालकाला व यानंतर महाप्रसाद वितरण केला जाईल. मंदिर संचालक मंडळाने सुलभ दर्शन आणि महाप्रसादाचे चोख नियोजन केले आहे. श्रीचे दर्शन आणि प्रसादाच्या लाभ घ्यावा. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज देवस्थान समिती, शितलवाडी तर्फे करण्यात आलेले आहे.

Popular Articles