गोंदिया :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे तसेच खरीप रब्बी हंगामाचे बोनस व चुकारे मिळाले नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचे पत्र गोंदिया जिल्हा पणन विभाग कार्यालयाला दिले आहे आपला देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण या देशात शेतकऱ्यांच्या पिकांचे चुकारे जर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या या समस्याकडे शासन लक्ष देत नाही शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न शेतकरी देखील करत आहेत. शेतकऱ्यांनी 2025 26 हंगामात धान पिकाची लागवड केली पण अजून पर्यंत धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही त्यामुळे शेतकरी देखील चिंताग्रस्त दिसून येत आहे. तसेच2024 -25 हंगामातील रब्बी तसे खरीप ते बोनस व धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकट निर्माण झाले असून हे आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांपुढे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून देखील दाखवले आहे या समस्याकडे लक्ष देत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी जिल्हा पणन विभाग कार्यालय गोंदिया गाठून थेट जिल्हा पणन अधिकारी यांना पत्र देऊन शेतकऱ्यांचे धानाचे बोनस व धानाचे चुकारे 19 फेब्रुवारी पर्यंत न शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास पाण्याच्या टाकीवर पाळणा बांधून आंदोलन करणार असल्याचे पत्र पणन विभागाला दिले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करून कोणते पाऊल उचलणार हे देखील पहावयास मिळेल हे मात्र नक्की..
शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून शासनाचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही. धानाचे चुकारे व बोनस जमा झाले नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिलेल्या तारखेच्या आत पैसे जमा न झाल्यास आंदोलन करणार
– महेंद्र भांडारकर प्रहार जिल्हाध्यक्ष गोंदिया




