नागपूर :- एकात्मता नगर येथील एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुरेखा मानवटकर, एकात्मता हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय.सी.बोरकर तसेच एकात्मता नगरचे उद्योजक व समाजसेवक मिथुन नागदेवते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मिथुन नागदेवते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शरद उरकुडे यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका शुभांगी कातुरे, जयमाला धोटे, सुनिता गावंडे व धनश्री यांनी विशेष परिश्रम घेतले.




