– १४ गावांना फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा
रामटेक :- प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता हे शासनाचे कर्तव्य आहे. सुरषितता प्राप्त करवून घेणे हा नागरिकांचा अधिकार आहे. शासनाकडून या अधिकारालाच छेद दिला जात आहे. आरोग्यासाठी फ्लोराईड हानीकारक असताना तालुक्यात तब्बल १४ गावांत फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाने यावर मार्ग काढण्यासाठी उपाययोजनांचे विविध प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविले आहे. शासनाच्या उदासिन धोरणात सर्व प्रस्ताव धुळखात पडले आहे. तेव्हा नागरीकांच्या आरोग्याच्या प्रश्नापेक्षा रस्ते, नाल्यांच्या कामांना प्राधान्य देणे हे कितपत योग्यआहे, याचे उत्तर शासनानेचद्यावे, नागरिकांचे हे म्हणने वास्तवाला धरून आहे. सुत्रांच्या माहीतीनुसार, रामटेक तालुक्यातील २० गावे फ्लोराइडयुक्त पाण्याने बाधीत होती. पाण्याची गुणवत्ता तपासणीनंतर १४ गावांना फ्लोराईडयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले. या गावांत पुरवठा होणाऱ्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण पाण्याच्या तुलनेत अधिक आढळून आले. फ्लोराईडयुक्त पाण्याचा विशेषतः दातांवर दुष्परीणाम होवून समस्या उद्भवतात. पाण्यात फ्लोराइड आवश्यक आहे. मात्र ते प्रमाणापेक्षा अधिक असल्यास मानवी शरीराला घातक असते. संबंधित प्रशासकीय यंत्रणा या समस्येवर मार्ग काढण्यास तयार आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. राज्यकर्त्यांनी विनाविलंब निधीची तरतुद करण्याची नितांत गरज आहे.’ सरकारी काम अन् वर्षभर थांब’ हा राज्यकर्त्यांचा शिरस्ता आहे. मात्र, प्रश्न मानवी जीवनाचा आहे. किमान आरोग्यदायी पाणी मिळण्यासाठीच्या पाण्यासारख्या महत्वाच्या विषयात राज्यकर्त्यांकडून विलंब व्हायला नको. स्वतःच्या घरी ‘ऑरो’ चे पाणी पिणारे हे राज्यकर्ते ज्यांच्या भरवशावर ते निवडूण आलेले आहे. त्याच नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नावर गंभीर नाहीत. ही वास्तवकता म्हणावी की, निवडणुकीत निवडूण दिल्याचा शोकांतीका म्हणावी, हा प्रश्न आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाले आहे. पाणी स्त्रोतांची पाणी पातकी खोलात गेली आहे. गावखेड्यातील लोकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थिती फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा म्हणजे’ दुष्काळात तेरावा महीना’ असेच म्हणायची वेळ या गावांतील लोकांपुढे आली आहे.








