spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवेचा आदर्श : आज होणार सामूहिक लग्न वाढदिवस सोहळा 

– १२१ जोडप्यांच्या सामूहिक लग्न वाढदिवस सोहळा 

सचिन चौरसिया,रामटेक :- महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मेहर (बाबुजी) यांच्या ५१ व्या लग्न वाढदिवसानिमित्त सामुहीक लग्न वाढदिवस गोल्डन ज्युबिली सोहळ्याचे आयोजन रामटेक येथील परमात्मा एक आनंदधामच्या वतीने व्यसन मुक्ती अभियान अंतर्गत १२१ जोडप्यांचा आज दि.१ जुन ला सोमवारी सायंकाळी ५ वाजता आनंदधाम रामटेकच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यात लग्नाला ५१ वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष झालेले ३० जोडपी, ४० वर्षापेक्षा अधिक वैवाहिक जीवन पूर्ण केलेली ५३ जोडपी आणि लग्नाला ३० वर्षापेक्षा अधिक सहजीवन पूर्ण केलेली ३८ जोडपीं सामुहिक लग्न वाढदिवस सोहळ्यात आनंदधाम येथे सहभागी होणार आहे. याप्रसंगी सप्तखंजेरीवादक इंजि.चेतन बर्वे यांचा बाबा जुमदेवजींच्या जिवन चरित्रावर व्याख्यान होणार असून सोहळ्याचे संचालन अमोल शेंडे करणार आहेत. कार्यक्रमाला राजकीय मंडळी तसेच समाजसेवक, नगरसेवक विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थीत सर्व सेवक व सेविका तसेच पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा परमात्मा एक आनंदधाम चे राष्र्टीय अध्यक्ष, युवा मार्गदर्शक बजरंग मेहर यांनी माहीती दिली.

सामुहिकरीत्या लग्न वाढदिवस साजरा

लक्ष्मणराव मेहर (बाबुजी) आनंदधाम रामटेक यांच्या ४५ वर्षातील सखोल मौलिक मार्गदर्शनामुळे लाखो परिवार व्यसन मुक्त, सुखी, समाधानी जीवन जगत आहेत. तसेच लक्ष्मणराव मेहर (बाबुजी) यांचे अनेच कार्यक्रमामध्ये सहकार्य करून धार्मिक, सामाजीक तसेच राष्ट्रीय कार्यातही सहभागी होत असतात. लक्ष्मणराव मेहर (बाबुजी) यांना वाटले की अशा प्रकारे मला साथ देणाऱ्या, परमात्मा एक सेवकांसाठी मी काहीतरी एखादा नवीन उपक्रम राबवावा, मी माझा लग्नाचा वाढदिवस माझ्याच कुटूंबात एकट्यातच साजरा करण्यापेक्षा माझ्या सेवकांसोबतच सामुहिकरीत्या लग्न वाढदिवस साजरा केला तर सर्वांचाच आनंद द्विगुणीत होईल.

Popular Articles