spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुरेशा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये – तालुका कृषी अधिकारी प्रदीप गंगावणे 

कामठी :- कामठी तालुक्यातील सुरादेवी येथे एल निनो संकटामुळे उद्भवण्याची शक्यता असणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याबाबत प्रचार प्रसिध्द करण्या करिता शिवार फेरी काढण्यात आली व शेतकऱ्यांना उताराला आडवी पेरणी, रुंद वरंबा सरीवर लागवड, पुरेशा प्रमाणात पाऊस झाला शिवाय पेरणी करू नये, मृद आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करणे, आंतर पीक घेणे, पाणी संवर्धन, सापळा पिके, योग्य पिकाची निवळ याबाबत मार्गदर्शन कामठी तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली व सुरू असलेल्या तूर पिकाच्या डिजिटल शेतीशाळेबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमाला उप कृषी अधिकारी कविता ढोके, एस डी टेकाम , मनोज यादव, सुनील उज्जेनवार सहाय्यक कृषी अधिकारी व गावातील शेतकरी . उदाराम पाटील, पुंडलिक काकडे, दशरथ गाऊत्र, गजानन फिके, प्रणव काकडे व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी खरीप 2026 वर एल निनो चे सावट असल्याने अवलंबिण्याच्या बाबींवर त्यांनी भर दिला.

*DSR पद्धतीने धानाची पेरणी

पारंपरिक पद्धतीने चिखलणी करून धानाची लागवड करण्याऐवजी पेरणी यंत्राच्या सहाय्याने धान पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून एल निनो करिता तयार करणे व पाण्याचा शाश्वत वापर करणे याबाबत सूचना दिल्या व जास्तीत जास्त धानाचे क्षेत्र या पद्धतीने वाढविण्याच्या सूचना केल्या.

 *कापूस पिकातील महत्वाचे बदल

तालुक्यातील कापूस पीक देखील मोठ्या प्रमाणावर असून शेतकऱ्यांनी कापसाची लागवड ही सरी वरंबा पद्धतीने करावी व लागवडीच्या वेळी बेसल डोस देण्याच्या सूचना केल्या. तसेच कापूस पीक हे HDPS ( High Density Planting System) या पद्धतीने लावण्याच्या सूचना केल्या.

 *सोयाबीन पिकाची BBF ने लागवड

मागील वर्षी जास्त पावसाने झालेले सोयाबीन चे नुकसान व या हंगामातील एल निनो चे सावट लक्षात घेता सोयाबीन पिकाची पेरणी रुंद सरी वरंबा यंत्र वापरून करावी जेणेकरून सोयाबीन पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. जिथे BBF उपलब्ध नसेल त्या ठिकाणी सरी वर्ंभा पद्धतीने सोयाबीन लागवडीवर भर देण्यात यावा.

 *सोयाबीन आंतरपीक तूर म्हणजे शाश्वत उत्पन्नाची हमी

सरी वरंबा पद्धतीचा वापर करून सोयाबीन च्या 3 ते 4 ओळींतर तुरीची 1 ओळ लावल्यास दोन्ही पिकांचे उत्पन्न चांगले येऊन शेतकऱ्यास जास्तीचा फायदा होईल. यावर्षीच्या खरीप हंगामात कमी दिवसात निघणारे आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीच्या बियाणांची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे जोखीम कमी करण्यासाठी वारंवार एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरणार आहे तालूकयात जलशिवारास्याकामालागती देणे गरजेचे आहे. पाणी आडवा धोरण शेतकन्यांनी अंगी करावे. शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनाचा शक्य तिथे वापर करणे हितावह ठरणार.

तसेच तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गाव सुपिकता निर्देशांकाचा वापर करून महाविस्तार AI मधील खत गुणक या प्रक्रियेचा वापर करूनच शेतात खत वापरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.