गडचिरोली :- महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित चाचा नेहरू जिल्हास्तरीय बाल महोत्सव व क्रीडा स्पर्धा २०२५–२६ चे उद्घाटन दिनाक 06 जानेवारी २०२६ रोजी अहिल्यादेवी बालगृह, घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय अंकुश पी. खानोलकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, गडचिरोली यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय बी. मुंडे, विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास विभाग, नागपूर विभाग, नागपूर हे उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून रूपाली दुधबावरे, सरपंच ग्रामपंचायत घोट, वर्षा मनवर, अध्यक्ष बाल कल्याण समिती गडचिरोली, ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली ममता लांजेवार, प्राचार्य नवोदय विद्यालय घोट, विनोद हटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी चामोर्शी, किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस मदत केंद्र, घोट, ॲड. अरुण अंजनकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, गडचिरोली, डॉ. विवेक हजारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र घोट, सिस्टर मर्लीन मॅडम लोकमंगल संस्थेचे सचिव, विलास ढोरे परिविक्षा अधिकारी गडचिरोली, अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली, महेश रणदिवे शासकीय मुलांचे बालगृह गडचिरोली हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जयंत जथाडे, सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश रणदिवे, अधीक्षक, निरीक्षण व बालगृह, गडचिरोली यांनी केले.
बाल महोत्सवात पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रथम क्रमांक – नवोदय मराठी प्राथमिक शाळा, घोट तर द्वितीय क्रमांक – परमपूज्य महात्मा गांधी विद्यालय घोट यांनी, पटकावला.
या महोत्सवाचा उद्देश बालगृहातील मुला-मुलींमध्ये बंधुभाव, सांघिक भावना, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे हा असून, कार्यक्रमास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी, बालगृहातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.








