नवी मुंबई :- सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग अधिनस्त शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींचे व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग बाळासाहेब सोळंकी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
या कार्यक्रमास खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ खोपोली चे कार्यवाह किशोर पाटील, अध्यक्ष संतोष जंगम, बी.एल.पाटील तंत्रनिकेतन कौन्सिल चे अध्यक्ष जितेश ठक्कर, बी.एल.पाटील तंत्रनिकेतन खोपोली चे प्राचार्य प्रशांत माने, रत्नागिरी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे, सिंधुदूर्ग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकने, पालघर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे, ठाणे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण समाधान इंगळे, मुंबई सहायक आयुक्त, समाज कल्याण रविकिरण पाटील, रायगड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव आदि मान्यवर उपस्थितहोते.
खोपोली येथे सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि. 6 व 7 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवास मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सुमारे 400 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत कबड्डी खो-खो, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन रायगड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम बुधवार, दि.7 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.








