spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पदग्रहण करण्यापूर्वीच लागले नगरसेवक कामाला, अंधारात गेलेल्या प्रभागात केला उजेड, भरलेले गटार आणि दुर्गंधीत पाण्यापासून सुटका, नागरिकांकडून कौतुकाची थाप

खापा :- नूकताच एक महिना अगोदर निवडणूक पार पडली. जनतेने स्वेच्छेने युवा नगरसेवकांना साथ दिली. जनतेचे हे मतास्वरूपी मिळालेल्या कर्जाची परतफेड नगरसेवक आपल्या कामातून करत आहे. प्रभाग पाच मधून निवडून आलेले नगरसेवक मिलिंद बुरडे यांच्या प्रभागातील महाजनपुरा येथील पथदिवे हे अनेक दिवसांपासून बंद होते. त्याकरिता त्यांनी त्वरित दोन-तीन दिवसात पाठपुरावा करत, पथदिव्याची दुरुस्ती नगर परिषद कर्मचारी यांच्यामार्फत स्वतः नजरेसमोर करून घेतली.

तसेच आवते मेडिकल स्टोअर, लांबट स्टील स्टोअर जवळील चेंबर अनेक दिवसापासून जाम होते. त्यामुळे चेंबर मधून दूषित दुर्गंधीत पाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे प्रभाग पाच मधील जनतेला सहन करावा लागत होता. हे निदर्शनात घेऊन नवनियुक नगरसेवक मिलिंद बुरडे यांनी जाम असलेले चेंबर त्वरीत स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह स्वतः हजर राहून स्वच्छ करून घेतले. रस्त्यावर वाहत असलेल्या दूषित दुर्गंधित पाण्यापासून सुटका केली.

यानिमित्ताने प्रभाग पाचचे नवनियुक्त नगरसेवक मिलिंद बुरडे यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यावेळी इस्माईल (बब्बू बाबा) शेख, मुस्ताक सुभेदार, अफसर छवारे, मेहबूब शेख, रितेश गुप्ता, विरेंद्र तातेड, सारंग आवते, राजेश गुप्ता, मुस्तफा शेख, इस्राईल शेख, साकिर शेख, दिलीप लांबट, रफीक (कालू) शेख, अनिस शेख तसेच परिसरातील नागरिकांनी मिलिंद बुरडे यांचे कौतुक करीत पाठ थोपाटली.

मनोगत:- जनतेने मत स्वरूपात मला दिलेल्या कर्जाची परतफेड मी जनतेच्या छोट्या मोठ्या कामातून करणार, जनतेने कधीही मला कोणते कामासाठी आवाज द्यावी, मी सदैव जनतेच्या सेवक म्हणून सेवा करण्यासाठी तत्पर राहणार आहे.

– मिलिंद बुरडे, नवनियुक नगरसेवक, नगर परिषद, खापा.

Popular Articles