Monday, March 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे नवनिर्वाचित नगरसेविका चा सत्कार व पारितोषिक वितरण संपन्न

नागपूर :- जागतिक महिला दिन मनपा कक्ष तसेच सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट च्यावतीने आज स्थायी समिती सभागृहात साजरा केला.

मुख्य वक्ता दयाशंकर तिवारी माजी महापौर मुख्य अतिथी सुकेशिनी तेलगोटे, सहा आयुक्त महापौर शासन व सदस्य सचिव, नागपूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समिती, माजी महापौर नंदा जिचकार, रमेश सातपुते होते तर अध्यक्ष स्थानी मनोहरराव खर्चे होते.

“जागतिक पटलावर भारतीय महिलांचे योगदान” ह्या विषयावर मा दयाशंकर तिवारी यांनी प्रकाश टाकला.

संचालन समन्वयक न सचिव सुरेश रेवतकर यांनी, यादी वाचन प्रमीलाताई राऊत यांनी केले.

आभार अड मोरेश्वर उपासे यांनी केले. काशिनाथ धांडे, संजय अस्वले, माधुरी भुजाडे, सुनिता मेश्राम यांनी परीश्रम घेतले. मनपा प्रशासनाने मोफत हाॅल उपलब्ध करुन दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com