किशोर साहू, मौदा, ता. ३१ :- रामटेक नगर परिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन यांच्यावर सध्या सत्कार व शुभेच्छांच्या वर्षाव होत असून, त्यात मौदा तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात नुकतेच प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सत्कार केला व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मौदा तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपाचे माजी जि प सदस्य कैलास बरबटे, शिवसेनेचे चाचेर- निमखेडा सर्कल प्रमुख भूमेश्वर चाफले, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजूदादा वाघमारे, गांगणेर (हिवरा)उपसरपंच मोतीराम घरजाळे, येसंबा उपसरपंच धनराज हारोडे, बाबदेव सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कारेमोरे, चाचेर चे भाजपा पदाधिकारी एकनाथ टेंभरे सह मित्रपरिवार उपस्थित होते.








