spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पश्चिम बंगालच्या जनतेने गुंडाराज नाकारून विकासाला साथ दिली – ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :- पश्चिम बंगालमध्ये दीदींचा गुंडाराज संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा इतिहास घडवला आहे. यासोबतच आसाम आणि पुद्दुचेरी या दोन्ही राज्यांमध्ये देखील एकहाती यश खेचून आणले आहे. हे यश म्हणजे जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखविलेला विश्वास आहे.

तृणमूल कॉंग्रेसने मागील १५ वर्षांच्या सत्ताकाळात चालविलेले तु्ष्टिकरण, परिवारवाद व दहशतगर्दीच्या राजकारणाला सपशेल नाकारत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, राष्ट्रवाद, सुशासन व पारदर्शी कार्याचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.

देशाला दूरदर्शी नेतृत्व लाभलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि गृहमंत्री अमित शाह यांचे सुक्ष्म नियोजन आणि संघटनबांधणी यासोबतच हजारो कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या नावावर फोफावणारा गुंडाराज आणि विकासाचे केवळ स्वप्न दाखवून होत असलेली फसवणूक यावर हा निकाल चोख उत्तर आहे. एकीकडे देश विकासाच्या वाटेवर स्वार असताना पश्चिम बंगालची जनता मात्र तुष्टीकरणाला बळी पडत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांनी या निकालातून पश्चिम बंगालच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे, अशीही प्रतिक्रिया ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.