spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

समस्या, अहो आम्ही बँकेत वर जायचे तरी कसे!

पियूष बुरडे यांच्या पुढाकाराने दिव्यांगांना दिलासा

खापा,  २१ :  खापा शहरात बँक ऑफ बडोदा ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असून त्याची शाखा नगर परिषद कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर असल्यामुळे खापा शहरातील जवळपास 150 दिग्यांग बांधवांना त्यांचे वैयक्तिक कामाकरीता बँकेत पायऱ्या चढून जाणे येणे करीता अतिशय त्रासदायक होते.

मागील 5 वर्षांपासून पासून बँकेने खाली अशा लोकांसाठी सुविधा व्हावी म्हणून वैभव गोडबोले द्वारा ग्राहक सेवा केंद्र संचलित होते. यामुळे या दिव्यांग बांधवांना मदत होत होती.
परंतु तांत्रिक अडचणीमुळे गोडबोले यांची आयडी बंद करण्यात आली. परंतु आता तडमजल्यावर खाली कुठलाही ग्राहक सेवा केंद्र सेवेत नसल्यामुळे दिव्यांग बांधव, म्हातारे आणि ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या होणाऱ्या त्रासामुळे माजी तालुका महामंत्री भाजपा पियूष बुरडे यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा दिव्यांग आघाडी खापा शहर अध्यक्ष किशोर हेडाऊ, हर्षल श्याम नंदनवार, शरीफ गणी काजी, गुणवंत उइके, पतीराम पारडकर इत्यादी दिव्यांग बांधवांना घेऊन शाखेत पोहोचून, यांची समस्या मांडली.

या दिव्यांग बांधवांना होणारा त्रास लक्षात घेता खापा शाखा प्रबंधक रिंकू कुमारी यांनी या सर्व दिव्यांग बांधवांसाठी भवानी माता मंदिर येथे बाजार चौक खापा येथील गौरव पलांदूरकर द्वारा संचालित “ग्राहक सेवा केंद्र” सर्व सुविधा पुरविण्यात येईल असे आश्वस्त केले.

यावेळी खापा नगरपरिषद माजी उपाध्यक्ष देवाजी बोरकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर बुरडे, भाजपा खापा महामंत्री सतीश लांजेवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव उपस्थीत होते.

या निमित्ताने सर्व दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना मासिक मिळणारा लाभ अनुदान रुपये 1500 वरून 2500 केल्याबद्दल, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब व आमदार आशिषभाबू देशमुख यांचे आभार मानले.

तांत्रिकी कारणास्तव माझ्या ग्राहक सेवा केंद्राची आयडी बंद असल्यामुळे नागरिकांना व दिव्यांग बांधवांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. मी पाठपुरावा करीत आहे. तरी माझी आयडी लवकरात लवकर संचालित होईल. :- वैभव गोडबोले, संचालक, ग्राहक सेवा केंद्र, बँक ऑफ, बडोदा, खापा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.