– दुधाचे पडलेले भाव आणि मजुरांच्या हाताला काम नसणे हेच सरकारचे मोठे अपयश
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांची आणि शेतकऱ्यांची निराशा करणारा आहे.
कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवून चालणार नाही तर कृषी विद्यापीठाने शेतमालाला खर्च वजा जाता जे भाव सुचवले त्याच्या ४० टक्के भाव केंद्र सरकारने जाहीर केले हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.गुंतवणूक वाढवून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असेल तर उपयोग होईल . प्रतेक वर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देण्याची आतापर्यंत अमलबजावणी झाली नाही. मधुमेहाची आणि कॅन्सरच्या दवाईच्या किंमती कमी करू असी घोषणा केली पण आज ची स्थिती लक्षात घेतली तर योजनेतून कैंसर वर उपचार होत असला तरी रुग्णांची मोठ्याप्रमतात लूट होत आहे या कडे सरकारचे दुर्लक्ष आहे .दुधाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे जनावरे कत्तलखान्यात विकली जात आहेत .जी रामजी योजनेत ४० टक्के हिस्सा राज्य सरकारला भरायचा असल्याने मजुरांच्या हाताला ५० दिवसही काम मिळणार नाही .राज्य सरकारवर येवढा कर्ज असतानी ४० टक्के कुठून भरणार हा प्रश्न उपस्थित राहणार आहे .एकंदरीत शेतकरी शेतमजूर यांचेवर अन्याय करणार हा अर्थसंकल्प आहे .








