किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे नुकताच तीन दिवसीय वार्षिक व सांस्कृतिक क्रीडा महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम चे उद्घाटन माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गट ग्रामपंचायत दहेगाव सरपंचा भारती संदिप आंबिलढुके होत्या.
प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर निखिल भुयार, पं स मौदा गट विकास अधिकारी डॉ.महेश बेहेकर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर किरण चीनकुरे, मौदा गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे , उपसरपंच गट ग्रा पं दहेगाव रवींद्र ढोमणे , इंजिनिअर मिहान नागपूर ज्ञानेश्वर देशमुख, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव नितेश इंगळे, उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके , शिक्षण विस्तार अधिकारी ललिता चामट, रामेश्वर भक्तवर्ती , केंद्रप्रमुख धानला राजू आंबिलकर, माजी सरपंच मोरेश्वर आंबिलढुके रमेश आंबिलढूके ,माजी उपसरपंच संदिप आंबिलढुके, दहेगाव शाळा व्यवस्थापन समितीचे व गट ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले .आपल्या प्रास्ताविक भाषणात तीन दिवसीय स्नेहसंमेलन आयोजन करण्यामागचे उद्देश सर्वांना सांगितले. पहिल्या दिवशी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन आणि सर्व पालकांचे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम चे उद्घाटन घेण्यात आले .या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणे आणि प्रत्येक कार्यक्रमात पालकांचा कसा सहभाग मिळेल या दृष्टीने पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या,हा त्यामागचा खरा उद्देश होता.
उपस्थित सर्व मान्यवर व अधिकारी वर्गांनी आपल्या मनोगतामध्ये पीएम श्री जिल्हा परिषद दहेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम बघितल्यानंतर जिल्हा परिषद च्या शाळेनी केलेल्या प्रगतीबद्दल व घेतलेल्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन बघून आनंद व्यक्त केले व सर्व शिक्षकवृंदाचे कौतुक केले.या तिन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या शाळेतील शिक्षक लिलाधर काळबांडे, सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे, राजेश रोहाड ,सुजाता बोदेले,प्रज्ञा रामटेके, संगीता आंबिलढुके, उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेश रोहाड यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षक सुधीर कांबळे यांनी केले.




