Friday, March 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तीन दिवसीय ‘भारत फोटो फेअर 2026’ चे 27 रोजी उद्घाटन कार्यशाळा, टॉक शो, प्रदर्शनीचे आयोजन

नागपूर :- कॅव्‍होक सर्विसेसच्‍यावतीने ‘भारत फोटो फेअर 2026’ या भव्‍य प्रदर्शनीचे 27, 28 व 29 मार्च 2026 दरम्‍यान नक्षत्रा बॅन्क्वेट, एम्प्रेस मॉल, नागपूर येथे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रदर्शनी, कार्यशाळा, स्‍पर्धा, फॅशन शो, मॉडेल शुट, पुरस्‍कार असे भरगच्‍च कार्यक्रम या तीन दिवसीय फेअरमध्‍ये सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत कॅव्‍होकचे संचालक सुमीत जैन यांनी दिली. या प्रदर्शनीत सोनी, फुजीफिल्‍म, निकॉन, डिज‍िटेक, टॅमरॉन आदी 100+ आघाडीचे फोटोग्राफी ब्रँड्स सहभागी होत आहे. कॅमेरे, लेन्स, अॅक्सेसरीज, लाईट्स, स्टुडिओ सेटअप, अल्बम, प्रिंटर्स आदी एकाच छताखाली बघण्‍याची संधी नागपूरकरांनी मिळणार आहे. या कार्यक्रमात 3 कार्यशाळा, 2 टॉक शो, तसेच 15+ इंडस्ट्री मेंटर्स आणि 20+ इन्फ्लुएंसर्स सहभागी होणार आहेत. 27 मार्च रोजी दुपारी 12 वाजता महापौर सौ. नीता ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून विविध मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता ‘फोटोग्राफी–राईट इक्विपमेंट – बिझनेस डेवलपमेंट अँड मोअर’ विषयावर टॉक शो होणार असून यात प्रसिद्ध फोटोग्राफर मानसी थक्‍कर, जयंत पेडनेकर, विनोद देशपांडे व संगीता महाजन सहभागी होतील. 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता. ‘फोटोग्राफी विथ मल्टिपल फ्लॅश’ विषयावर फोटोग्राफर जयंत पेडणेकर श्रोत्‍यांशी संवाद साधतील. दुपारी 3 वाजता ‘न्‍यू बॉर्न अँड मॅटर्निटी शूट’ विषयावर फोटोग्राफर अनघा जांभूळकर आपले विचार मांडतील. दुपारी 4 वाजता ‘फ्रॉम लेन्‍स टू अल्‍बम : फोटो जर्नालिजम अँड वाईल्‍ड लाईफ डिझाईन’ विषयावर टॉक शो होणार असून यात प्रसिद्ध फोटोग्राफर व डिझायनर विवेक रानडे, फोटोजर्नालिस्‍ट अनंत मुळे, वाईल्‍ड लाईफ फोटोग्राफर सरोश लोढी व अल्‍बम डिझायनर के. गणेश यांचा सहभाग राहील.या उपक्रमाला अल्ताफ एच.वली, बंधन लॅब, के गणेश अकॅडमी यांचे सहकार्य असून ऑरेंज सिटीटोग्राफर्स क्लब (OCPC) व फोटोग्राफर्स असोसिएशन नागपूर (PAN) यांचे समर्थन लाभले आहे. फोटोग्राफी प्रेमी व व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंचावरील सुमित जैन, चेतन जोशी, गजानन रानडे, श्रीकांत बेसेकर, आनंद निर्भवणे, राकेश मस्के, राजन गुप्ता, महेश काळबांडे आणि नरेश नेरकर यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com