spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रस्त्याच्या कामामुळे चांदपूर बस फेरी बंद; श्रीराम नवमी उत्सवावर विरजण, पर्यायी मार्गाची मागणी

हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या चांदपूर येथे श्रीराम नवमी उत्सवाचा उत्साह असतानाच, तुमसर-चांदपूर बस सेवा बंद झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदेखारी ते चुल्हाड दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने गेल्या ८-१० दिवसांपासून ही बस फेरी बंद करण्यात आली आहे. विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना या निर्णयामुळे यात्रेच्या काळातच प्रवासाच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

बस सेवा बंद असल्याने भाविकांना ५ ते ७ किलोमीटरची पायपीट करावी लागत असून, नाइलाजास्तव काळी-पिवळी सारख्या खासगी वाहनांतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. भाविक आणि परिसरातील नागरिकांचे हित लक्षात घेता, ही बस फेरी सिहोरा ते गोबरवाही फाटा मार्गे मुरलीवरून वळवून तातडीने सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या मार्गामुळे चांदपूर, टेमनी, मोहाडी खापा आणि मांगली येथील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार असून, लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची ही ‘तारेवरची कसरत’ थांबवावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

Popular Articles