– महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांनाही होणार फायदा..
गोंदिया :- शहराला लागून असलेल्या बिर्सी विमानतळावर वरून गोंदिया-इंदोर -बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवा नव्याने सुरवात करण्यात आली आहे. तर या आधी देखील इंदोर -गोंदिया -हेंद्राबाद विमान सेवा सुरु करण्यात आली होती मात्र खा प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने बिर्सी विमानतळा वरून स्टार एयर लाईन ने गोंदिया-इंदोर-बंगलोर विमान सेवा सुरु केल्याने याचा फायदा तीन राज्यांना होणार आहे या विमान सेवेची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आली आहे तर आज पहिल्यांदा इंदोर वरून गोंदिया विमानतळा वर आलेल्या आणी गोंदिया वरून बैगलोर जाणाऱ्या लोकांनी विमान सेवा सुरु झाल्याने आनंद व्यक्त केला आहे . त्यामुळे मागील महिनाभरापासून याबाबत लागून असलेली प्रवाशांची उत्सुकता संपली आहे. स्टार एयर लाईन तर्फे ही प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात आली असुन या विमानसेवेचे वेळापत्रकसुद्धा आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज वेळापत्रकानुसार विमानसेवेला सुरवात झालेली आहे.

आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरू असणार आहे… मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारला बैंगलोर वरून दुपारी 2 वाजून 30 मिनीटांनी विमान इंदोर साठी उड्डाण घेईल तर सायंकाळी 4:30वाजे इंदोर ला पोहोचेल तर इंदोर वरून तिथून सायंकाळी ५ वाजता गोंदियासाठी उड्डाण भरेल आणि गोंदियाला सायंकाळी 5 वाजून 55 मिनीटांनी पोहोचेल, तर गोंदिया वरून सायंकाळी 6 वाजून 25 मिनीटांनी इंदोर साठी विमान उड्डाण भरेल व सायंकाळी 7 वाजून 20 मिनीटांनी इंदोर ला पोहोचेल व सायंकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी इंदोर वरून बैंगलोर साठी उड्डाण भरेल व रात्री 9 वाजून 45 मिनीटाला बैंगलोर ला पोहोचेल त्यामुळे गोंदिया वरून इंदोर किंवा बैंगलोर ला ट्रेन किंवा कार ने जाण्यासाठी लागणार 15 तासाचा प्रवास अवघ्या काही तासात पूर्ण करता येणार असल्याने प्रवास्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे तर येत्या काही दिवसात गोंदिया वरून मुबंई आणि पुण्या करिता देखील विमान सेवा सुरु करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गोंदियातील वरिष्ठ नेते राजेंद्र जैन यांनी दिली आहे तर गोंदिया विमान तळावरून खा प्रफुल पटेलांच्या प्रयत्नाने दुसऱ्यांदा विमान सेवा सुरु झाल्याने प्रवास्यांनी देखील खा प्रफुल पटेलांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी राजेंद्र जैन राष्ट्रवादी अजित पवार गट,सुनील रीजनल मैनजेर स्टार एयर लाईन बिरसी विमानतळ उपस्थित होते. प्रवाशांचे यावेळी पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.



