कविवर्य सुरेश भट सभागृहात प्रवेशिका वाटप सुरू

0
71

– 60 वर्षावरील दिव्यांग व वृद्धाश्रमातील आश्रीतांना मोफत प्रवेश

नागपूर, ता.१६ :- नागपूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीद्वारा नागपूर महानगरपालिका आणि मनपा ज्येष्ठ नागरिक कक्ष संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ दिव्यांग व वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांना मोफत प्रवेशिकांचे वाटप करण्यात येणार असून, कविवर्य सुरेश भट सभागृह येथे प्रवेशिका वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक सुरेश रेवतकर यांनी दिली.

“जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिक व कुटूंबातील सदस्यांकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना प्रवेशिकांचे वाटप केले जाणार असून, अधिकाधिक संख्येत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक सुरेश रेवतकर यांनी केले आहे.

कार्यक्रमात स्विप अंतर्गत जनजागृतीसाठी कार्य केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान, डॉ. रमेश थोरात यांचा एकपात्री एकांकिका, संजय भाकरे निर्मित दोन अंकी नाटक “बाकी शुन्य” सादर करण्यात येणार असून त्याचा लाभ नाट्यप्रेमी ज्येष्ठांनी घ्यावा असे आवाहन सिनीयर सिटीजन कौन्सील ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, सर्वश्री डॉ. मनोहर तांबुलकर, वसंत पाटील, मनोहर तुपकरी, वासुदेव वाकोडीकर, मधुकर पाठक, भगवान टिचकुले, काशीनाथ धांडे, विजय दीक्षित, अॅड. मोरेश्वर उपासे, प्रमिला राऊत, गीता महाकाळकर, माधुरी भुजाडे, देवराव सवाईथुल, अधिर बागडे, संजय अस्वले, देवेंद्र अहिरकर, धर्मराज नाकोड अविनाश नागदेवे यांनी केले आहे.

कौन्सीलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्वागत व व्यवस्थापन समिती मध्ये सर्वश्री फेस्काॅमचे अध्यक्ष सुधिर भगत, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजु मिश्रा , ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, सचिव अॅड अविनाश तेलंग, सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष मनोहर खर्चे यांची निवड करण्यात आली, अशी माहिती मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे समन्वयक सुरेश रेवतकर यांनी सांगितले आहे.