spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तोंडली जि. प. प्राथमीक शाळा विनोबा पुरस्काराने सन्मानित

किशोर साहू, मौदा,ता .९:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. प्राथमिक शिक्षण हा समाज व्यवस्थेचा पाया आहे त्यामुळे ते प्रभावीपणे पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांची तसेच पालकांची असते त्यासाठी विविध कृती तसेच उपक्रम राबवून शिक्षण प्रक्रिया आनंददायी करण्याचा प्रयत्न तोंडली शाळेतील शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षणातील खरा आनंद विद्यार्थ्यांना घेता येतो व अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यास मदत होते. या सगळ्या उपक्रमांची दखल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंतर्गत विनोबा टीमने घेतली. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अनुराधा धुर्डे यांना पोस्ट ऑफ द मंथ तसेच स्टार टीचर अवार्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराचे वितरण मौदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संकेत मरस्कोल्हे तसेच विनोबा टीमचे निलेश नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. नवनवीन उपक्रम राबवत विद्यार्थी,शाळा यांची प्रगती पाहून कौतुकही केले. पुरस्कारातून प्राप्त शैक्षणिक साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले.यावेळी सहाय्यक शिक्षक निलेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक उपस्थित होते.

Popular Articles