– नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
नागपूर :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी अवजारे बँक स्थापन करणे तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत कृषी विभागातर्फे नुकतेच नियोजन भवन येथे पात्र बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. अर्चना कडू यावेळी प्रमुख अतिथी होते.
या प्रशिक्षणामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी, कृषी विभागाच्या योजना, आत्मा अंतर्गत योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना तसेच कृषी अवजारे बँकेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. लॉटरी प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या ६३ महिला बचत गट/ग्रामसंघांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
एकूण १६० महिला प्रतिनिधींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. उपसंचालक, आत्मा पल्लवी तलमले, नोडल अधिकारी सागर कांबळे, उपसंचालक – पशुसंवर्धन विभाग नितीन फुके, (उपसंचालक – पशुसंवर्धन विभाग, नागपूर), पुरवठा व मूल्य साखळीतज्ञ स्वाती गावंडे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
सनदी लेखापाल हितेश अग्रवाल यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पंकज गिरडे यांनी कृषी पायाभूत योजनांबाबत माहिती दिली. प्रकल्प विशेषज्ञ कृषी व्यवसाय हेमचंद गुप्ता यांनी कृषी अवजारे घटक अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला अक्षय चांभारे ( प्रकल्प विशेषज्ञ – मनुष्यबळ विकास) बिलाल काझी (प्रकल्प विशेषज्ञ- प्रापण), शुभम भास्कर (लेखापाल), नितेश वानखेडे (तंत्रज्ञान समन्वयक), निलेश खंडारे (NRM समन्वयक), वालदे (तंत्रज्ञान समन्वयक, रामटेक), अभिषेक पाटील (तंत्र. सहाय्यक), पीयूष ढोबळे (MIS, स्मार्ट), अमित टिकेकर (लेखापाल, स्मार्ट), परेश मुक्तेश्वर (संगणक सहाय्यक), अल्केश खोब्रागडे उपस्थित होते.




