spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 52 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. शुक्रवार(ता.10) शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 34,300 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 300 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. 400 दंड) या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करून 3,600 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून १,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसणे, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरविणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 15,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.ओहयो हॉटेल यांनी रस्त्यालगत कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुलद करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. जसवीर बार अँड रेस्टॉरेंट, मे. क्ल्कर्स रेस्टॉरेंट व मे. न्यु श्रीनाथ फरसाण यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू. 15,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. रघुकुल कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. शोभा किचन हॉटेल यांनी चेंबरमध्ये उरलेले अन्न टाकल्यामुळे रू. 25,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत घनश्याम जसवानी यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. यादव किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत दिलीप बिजेवार यांनी टिंबर लाकडांमुळे फुटवाथ गुंतविल्यामुळे रु.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.