spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि.प. प्राथमीक शाळा तोंडली येथे जनजाती गौरव पंधरवाडा उत्साहात साजरा 

किशोर साहू, मौदा ,ता.१९ :- भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर जनजाती गौरव पंधरवडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, चर्चासत्रे, वारली चित्रकला, भित्ती चित्रे, नाट्य अशा कार्यक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी यात आवडीने भाग घेऊन आदिवासी संस्कृती जाणून घेतली. भावेश तिजारे व सोहम बारस्कर या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती जपणारी वारली चित्रकला शालेय परस बागेच्या भिंतीवर रेखाटली. संपूर्ण भारताला आदिवासी संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे याविषयी प्रत्येकाला आदर असायला हवा. 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरा करण्यात आली.ते एक महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, धार्मिक नेते आणि समाजसुधारक होते, ज्यांनी ब्रिटिश वसाहतवादाच्या विरोधात ‘उलगुलन’ (बंड) पुकारले आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे त्यांना ‘धरती आबा’ (पृथ्वीचा पिता) म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या जयंतीला ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अशी सखोल माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे तसेच सहशिक्षक निलेश जाधव यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली.

Popular Articles