नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सिद्धहस्त प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे
यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुरवठा उपायुक्त अनिल बनसोड, नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मतदार दिनाची शपथ
राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने यावेळी अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदार दिनाची शपथ दिली.




