नागपूर :- थोर समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विनम्र अभिवादन करण्यात आले.
सह आयूक्त (करमणूक कर) तुषार मठकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी नायब तहसिलदार कस्तूरी वैद्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी फुलगुच्छा वाहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले.

