Home Latest News सत्रापुर रस्त्यावर पायदळी ट्रक चालकास मारहाण करून लुटले

सत्रापुर रस्त्यावर पायदळी ट्रक चालकास मारहाण करून लुटले

0
102

कन्हान :- खंडेलवाल नगर येथील रिटा कम्पनीत टिन पत्रे भरून नेण्याकरिता आलेल्या दोन ट्रक चालक सायंकाळी कन्हान वरून जेवण करून पायदळ परत येताना सत्रापुर आम रस्त्यावर तीन अनोळखी इसमा ने त्याना थांबवुन दोघाना मारहाण करून अमोल कांबळे च्या खिश्यातुन बावीस हजार रूपये काढुन पळाल्याने तिन्ही आरोपी विरूध्द पोस्टे कन्हान ला गुन्हा दाखल करण्यात आला.

अमोल भारत काबंळे वय ४० वर्ष रा. रंगनाथ नगर वार्ड क्र.१७ वणी जि. यवतमाळ, हे १८ चाकी ट्रक क्र एमएच ४० बीजी ९९९५ चे चालक असुन बुधवार (दि.१७) ला सायंकाळी ४ वाजता रिटा कंपनी सत्रापुर कन्हान येथे पोहचुन टिन पत्रे भरणे करिता ट्रक उभा केला. तेव्हा ओळखीचा ट्रक चालक धिरज चव्हाण रा. वलनी (खापरखेडा) हा जेवण करण्यास जात असल्याने त्याचे सोबत जेवण करण्यास कन्हान येथे हॉटेल पाहत पाहत सायंकाळी ६ वा. दोघेही निघा लो व कन्हान येथे मेडीकल स्टोर्स मधुन दुखण्याची औषध घेवुन दोघेही कंपनीत ७.३० वा. पायदळ परत सत्रापुर गावच्या आम रस्ताने येत असता सडपातळ तीन इसम २५ ते ३० वयाचे रस्तावर उभे होते.त्यापैकी एक उंच व दोन ठेंगण्या बांध्याचे होते. काळा टी-शर्ट घातलेल्या उंच बांध्याचा इसमाने मला तु ड्रायव्हर आहे का, असे विचारले असता, हो ड्रायव्हर आहे असे म्हटले तेव्हा त्याने मला १०० रू मागितले मी त्याला पैसे दिले नाही. त्याने माझे हात पकडले व त्याचे सोब त असलेला पांढऱ्या रंगाची हाफ टि-शर्ट असलेल्या ईसमाने माझ्या नाकावर बुक्की मारली व माझे पैन्ट च्या डाव्या खिशात हात टाकुन २२००० रू. नगदी काढुन घेतले. एका ईसमाने धिरज चव्हाण चा हात मुरगडला आणि ते तिघे जन तिथुन पळुन गेल्याने फिर्यादी अमोल भारत काबंळे यांनी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन अनोळखी तिघा इसमा विरूध्द तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी थानेदार वैजयंती मंडवघरे यांचा मार्गदर्शनात पोस्ट कन्हान ला कलम ३०९ (६), ३(५) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.

फाईल फोटो