spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दोन मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू

सचिन चौरसिया, रामटेक २९ :– खैरी बीजेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पाचगाव भागांतील खाली जागेत असलेल्या खोल खड्डातील पाण्यात बुडवून दोन चिमुकल्या मुलांचा करुण अंत झाला. ही घटना शनिवार (दि. २६) दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. जी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. रिधान संजय सहारे (७ वर्ष ) व उत्कर्ष लोकेश लांजेवार (७ वर्ष) असे मृत मुलांची नावे आहेत. दोहेही पाचगाव येथील रहवाशी आहे. पोलीस सूत्रानुसार रिधान संजय सहारे (७ वर्ष) व उत्कर्ष लोकेश लांजेवार (७ वर्ष) दोघेही पाचगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसर्‍या वर्गात शिकणारे विद्यार्थी होते. शनिवारी दुपारी २ वाजता दोन्ही मुले शाळेतून घरी आली. ही मुले दुपारी गावाबाहेरील खाली मैदानात खेळण्यासाठी गेली होती. पावसामुळे काही खोल खड्ड्यांत पाणी साचलेले होते. खेळता खेळता या दोघांना खड्ड्यातील पाण्याची खोली लक्षात आली नाही आणि ते बुडाले. यावेळी कोणीही जवळपास नसल्याने त्यांना कुणाचीही मदत मिळू शकली नाही. सायंकाळी मुलांचे आई-वडील शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी मुलांचा शोध घेतला. गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता दरम्यान त्यांना खाली जागेत असलेल्या खड्ड्याजवळ दोघांच्याही चप्पल सापडल्या. एका तरुणाने खड्ड्याची खोली शोधली आणि तो दोघांचा शोध घेण्यासाठी खाली गेला. मुलांचे मृतदेह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आढळले. मृतदेह दिसताच कुटुंबातील सदस्यांनी मोठयाने रडायला सुरुवात केली. रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे

Popular Articles