spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धामणगाव येथे इनामी कुस्त्यांच्या आमदंगलने आजपासून दोन दिवसीय मंडईला सुरुवात

किशोर साहू ,मौदा ,ता. २९:- दरवर्षीप्रमाणे यंदा 40 व्या वर्षीही धामणगाव येथे आज बुधवार दिनांक 29 सप्टेंबरला दुपार दरम्यान इनामी कुस्त्यांच्या आमदंगलने दोन दिवसीय मंडईला सुरुवात होणार आहे. रात्री नऊ वाजता रंगकर्मी रंगभूमी वडसा तर्फे नवऱ्याच्या घरात ,बायको जोरात या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. गुरुवार 30 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पासून सायंकाळपर्यंत दिवसभर सोमलवाडा (लाखनी) ता. लाखनी, जि. भंडारा येथील अमर गायन पार्टी तुरा निशान शाहीर अंबादास यांच्या संपूर्ण पार्टी सहित खडी गमतीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी जि प सदस्य तापेश्वर वैद्य ,देवेंद्र गोडबोले, शालिनी बालू देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार शामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार कृपाल तुमाने, माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर, राजा तिडके, नंदा गोपाल लोहबरे ,स्वप्निल श्रावणकर, पुनम मंगेश तीघरे, नरेश मोटधरे, तुळशीराम काळमेघ, उमेश गभने ,प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील मंगेश मोटधरे ,खरेदी-विक्री सभापती युवराज ठाकरे ,सरपंच अक्षय पंचबुधे ,उपसरपंच राकेश मोटधरे ,ग्रामपंचायत सदस्य गण बलदेव नारनवरे ,अजित कडू, निलेश मोटधरे, श्याम नारनवरे ,रंजना मनोज कुकडे, संतोषी अरविंद बागडे, प्रियंका प्रमोद जुमळे, पल्लवी धनराज राऊत, वैशाली गुंडेराव डोंगरे ,संगीता संजय नारनवरे ,आखाडा समिती अध्यक्ष गजानन मोटघरे, उपाध्यक्ष श्यामराव बांते ,सचिव ताराचंद पंचबुधे ,कोषाध्यक्ष नाना भोयर सह गावातील ,परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी व मान्यवर उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय मंडई उत्सवाच्या लाभ घेण्याचे आव्हान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी विनोद दळणे ,अजित पाटेकर ,अनिल ढोरे, हेमराज सोनवाणे ,घनश्याम मोटधरे, नीलकंठ जुमळे ,कैलास मोटधरे, घनश्याम पंचबूधे, पंकज मांदाळे, किरण सोनवाणे, प्रमोद जुमळे, मयूर ठाकरे ,मयूर हिंगे, अनिल माटे, सुरज लेंडे, शुभम केदार, निखिल भोयर ,किरण ती तीरमारे, राकेश तांडेकर, राजू ढोके, तुलसीदास कुंभलकर सह समस्त सदस्यगण व धामणगाववासियांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.