किशोर साहू, मौदा, ता. ३:- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर – निमखेडा अंतर्गत येणाऱ्या भेंडाळा येथे सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम समिती तर्फे सांस्कृतिक मंडई कार्यक्रम उद्या मंगळवार (दि. 3 फेब्रुवारी)ला सुरुवात होणार आहे. मंगळवारला रात्री आठ वाजता वडसा येथील तीन अंकी नाटक घास एक मोहमाया , 4 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता पासून मु. चिखलाबोडी, पोस्ट निहारवाणी येथील शाहीर विजय गिरेपुंजे यांच्या न्यू प्रकाश सुभान पार्टी खडीगंमत राष्ट्रीय खडा तमाशा होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी ,सामाजिक कार्यकर्ता शामसुंदर वेलगापुडी ,प्रमुख उपस्थिती म्हणून कैलास बरबटे, स्वप्निल श्रावणकर, खेमराज चाफले, ज्ञानेश्वर चौरे, रमेश कारेमोरे ,रवी चव्हाण, प्रमोद बरबटे, श्रीनिवास यागंटी, शिवेश कंचरला, संकेत झाडे, शैलेश कोपरकर ,राहुल बावणे, लक्ष्मण उमाळे ,रवी फटिंग ,शिल्पा भोयर, सुषमा धांडे, वैशाली वाघाडे, सुनीता नगरारे, यशोदा भोयर, भामिता शेंडे, पोमू मानापुरे ,आकाश शंभरकर, गौरीशंकर कारेमोरे, अमोल उईके, कवडू वाडीभस्मे ,श्रीनाथ भोयर ,लक्ष्मण मल्लीपेदी सुधीर शंभरकर सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी, मान्यवर उपस्थित राहणार आहे .तरी या दोन दिवसीय मंडई उत्सव कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक समस्त भेंडाळा ग्रामवासी व मित्रपरिवार यांनी केले.




