spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जपाळेश्वर तलावात मामा-भाचीचा बुडून दुर्दैवी मृत्यू

– बापा सामोर लेकीची बुडून जलसमाधी

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या जपाळेश्वर देवस्थान परिसरात येथे वडीलासमवेत तलावात पोहण्याचा सरावांला गेलेल्या मामा भाचीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवार (ता.५) नोव्हेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हर्षाली विनोद माकडे (वय१३) रा. भोजापूर, अजय वामन लोहबरे (वय ३३), रा. खात-भंडारा असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मामा-भाचीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जपाळेश्वर (ता. रामटेक) येथील वडील, मामा-भाचीसमवेत जपाळेश्वर येथे पोहण्याकरिता आले होते. बुधवार सकाळी साडेसातच्या सुमारास हर्षाली पाण्यात पोहण्याकरिता उतरली असता अचानक ती खोल पाण्यात ओढल्या गेली. भाची पाण्यात बुडतांना पाहताच मामानी तिला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाहने दोघांनाही आत खेचून घेतल. वडिलांचा डोळ्या देखत मुलगी आणि साळा बुडाल्याने वडिलांनी आरडाओरड केली. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर गावातील येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रामटेक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत, स्थानिक नागरिक आणि गोताखोरांनी परिसरातील तलावात उतरून शोध मोहीम सुरू केली. दीर्घ प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनाला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्दैवी घटनेने भोजपुर परिसरात शोककळा पसरली आहे. या तलावाजवळ कोणतेही चेतावणीफलक किंवा सुरक्षाव्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. “जर सूचना दिल्या असत्या तर दोन निरपराध जीव वाचले असते,” अशी खंत ग्रामस्थांनी मांडली.

याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.