spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध जुगारावर वडोदा पोलिसांचा छापा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कामठी :- वडोदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे उमनाप पावनदेव रस्त्यालगत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच वडोदा पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपी जुगार खेळताना आढळून आले.

या कारवाईत राकेश ज्ञानेश्वर पेचे (वय ३०, रा. गुमथळा), साहेबराव नामदेवराव ठोके (वय ४५, रा. पारडी वॉर्ड क्र. ०३, गुमथळा) आणि प्रमोद भीमाजी वाघ (वय ५०, रा. पारडी वॉर्ड क्र. ०३, गुमथळा) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ ताशपत्ते आणि ₹२,५०० रोख रक्कम असा एकूण ₹२,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ अन्वये वडोदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.