किशोर साहू, मौदा :- अमली पदार्थ मुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम ,मनावर होणारा आघात , अमली पदार्थाची लत भागवण्यासाठी चोरीचे प्रयत्न त्यासाठी कुटुंबियांना भोगावा लागनारा त्रास ,यावर अरोली पोलीस स्टेशन तर्फे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे. असाच एक कार्यक्रम विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा येथे नुकताच घेण्यात आला.

याप्रसंगी अरोली पुलिस स्टेशन ठाणेदार स्नेहल राउत , हेड कॉन्स्टेबल सुनील बेलखुले व गृहरक्षक सैनिक यांनी ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. ठाणेदार राऊत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शाळा व इतर सामाजिक उपक्रमांना भेट देत समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबत नेहमी मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत विश्रांती कॉन्व्हेंट च्या अध्यक्षा डॉ. विश्रांती खांडेकर सह समस्त शिक्षकवृंदांनी त्यांच्या सत्कार केला.
यावेळी विश्रांति कॉन्वेंट च्या अध्यक्ष डॉ.विश्रांति खांडेकर, मुख्यध्यापिका बिंदु तगिरिसा , निर्देशक रक्षक खांडेकर, स्व.इंदिरा गाँधी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका वासनिक , तेजस्विनी खांडेकर, सिधार्थ उईके सह शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.




