spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

 नागपूर ०७: रवीनगर, नागपूर सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर येथे आषाढी एकादशी निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळेच्या परिसरात पारंपरिक वेशभूषेत दिंडी मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात “विठोबा राया पंढरीचा” जयघोष करत संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकले. विद्यार्थ्यांनी संतांची रूपं साकारत वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. संत तुकाराम, संत नामदेव यांचे अभंग भक्तिरसात ओतप्रोत होते. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमा निमित्य सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय महान च्या निवृत्त प्राचार्या  विजया दहीकर प्रमुख पाहुण्या तसेच शाळेच्या प्राचार्या  वंदना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अभिमानास्पद परंपरा असून विद्यार्थ्यांनी तिचे जतन करण्यास सांगितले. शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन  विजया दिक्षित यांनी केले.

Popular Articles